आंबेगावात १० हजार एकरवर कांदा लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात १० हजार एकरवर कांदा लागवड
आंबेगावात १० हजार एकरवर कांदा लागवड

आंबेगावात १० हजार एकरवर कांदा लागवड

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ४ : आंबेगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे या वर्षी कांदा लागवड हंगाम लांबला. मात्र, आता कांदा लागवड अंतिम टप्यात आली आहे. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रात कांदा लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर आहे .या वर्षी चांगला पाऊस झाल्याने हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच गावांगावातील पाझर तलावातही चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले होते. परंतू ढगाळ हवामान व धुक्यामुळे कांदा पिकावर करपा, भुरी, मुळकुज आदी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड थांबविली होती. पुन्हा कांदा लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी चार ते पाच टक्यांनी कांदा लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यापर्यत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा सर्वाधिक फटका कांदा रोपांना बसला होता. तर शेतात पाणी साचल्याने काही शेतकऱ्याना कांदा रोपे टाकता आली नाही. तसेच बदललेल्या वातावरणाचाही फटका बसला. त्यामुळे उशिराने कांदा लागवड करावी लागली.
-नवनाथ काळे, कांदा उत्पादक

01567