खोडवा उसाची काळजी घेतल्यास उत्पादन वाढ

खोडवा उसाची काळजी घेतल्यास उत्पादन वाढ

महाळुंगे पडवळ, ता. ९ : “आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासणी, सुधारित बियाणे, लागवड तंत्र, पाणी व्यवस्थापन आदी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांनी खोडवा उसाची निगा व काळजी घेतल्यास उत्पादन वाढण्यास मदत होईल,’’ असे मत भीमाशंकर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिनकरराव आदक यांनी व्यक्त केले
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारकात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत खोडवा ऊस व पाचट व्यवस्थापन या विषयावरील चर्चसत्रात आदक बोलत होते.
“शेतकऱ्यांनी पाचट बारीक करून ते कुजविले पाहिजे. किमान पाच वेळा खोडवा पिकाची फवारणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेले असिटोबॅक्टर व वसंत ऊर्जा यांनी करावी. अॅझोफॉस्फो मायक्रोन्यूट्रॉन सूक्ष्म अन्नद्रव्य याची वेळोवेळी आळवणी केली तर उत्पादनात वाढ दिसून आली आहे,’’ असे आदक यांनी सांगितले.
“२०२३-२४ हंगामात तोडण्यात येणाऱ्या खोडवा उसाला प्रति टनाला भीमाशंकर कारखान्याकडून शंभर रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाने घेतला आहे,’’ असे भीमाशंकर कारखान्याचे संचालक अरुण चासकर यांनी सांगितले.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण चासकर, शरद सहकारी बँकेचे संचालक किसनराव सैद, अण्णासाहेब पडवळ, दीपक चासकर, किशोर डोके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अक्षय शेळके, भास्कर सैद, प्रवीण घेवडे यांनी केले. कळंब गट अधिकारी महेंद्र वाळुंज यांनी आभार मानले.

01575

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com