कोबीच्या पिकात सोडल्या शेळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोबीच्या पिकात सोडल्या शेळ्या
कोबीच्या पिकात सोडल्या शेळ्या

कोबीच्या पिकात सोडल्या शेळ्या

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ११ : आंबेगाव तालुक्यात कोबी पिकाचे बाजारभाव कोसळले आहेत. एक रुपयांपासून ते तीन रुपये प्रती किलो बाजार मिळत आहे. केलेल्या खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कळंब, चांडोली बुद्रूक (ता. आंबेगाव) परिसरातील शेतकऱ्यांनी कोबी पिकांमध्ये शेळ्या मेंढ्या सोडून दिल्या आहेत.
कळंब, चांडोली बुद्रूक, लौकी, साकोरे, नांदूर, चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ आदी ४० गावांत शेतकरी कोबी पीक घेतले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तरकारी बाजारात विक्री केल्यानंतर मालाचे वजन झाल्यानंतर रोख पैसे मिळत आहे. त्यामुळे नगदी पैसे मिळवून देणारी पिके घेण्याकडे शेतकरी कल आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे पिकावर करपा, अळी, पाकोळी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना महागड्या औषधांचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यातच दोन ते तीन रुपये प्रती किलो बाजारभाव मिळत असल्याने वाहतूक, मजुरी व उत्पादन खर्चही भागत नाही. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काढणी थांबविली आहे. शेतात मेंढ्या सोडून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे.

दीड एकर क्षेत्रात २५ हजार कोबी रोपांची लागवड केली होती. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोन ते तीन रुपये प्रती किलो बाजारभाव मिळाला. खते, औषधे, मजुरी असा एक लाख रुपये खर्च झाला. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने कोबीच्या उभ्या पिकांत मेंढ्या सोडून दिल्या.
-शिवाजी बारवे, कोबी उत्पादक

01583