महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे
महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १८ : “महिला आयुष्यभर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काबाड कष्ट करतात. आपल्या कुटुंबाला मोठे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात. त्यामुळे महिलांनी कुटुंबाबरोबरच आरोग्याकडे लक्ष द्यावे,’’ असे आवाहन भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी केले.

कळंब (ता. आंबेगाव) येथे जागतिक महिला दिनानिमित्त यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, कमलजादेवी महिला स्वयंसहाय्य विभाग व ग्रामपंचायत कळंब यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘जागर महिला शक्तीच्या आरोग्याचा’ या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपना कानसकर होत्या.

यावेळी यशवर्धिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप, सचिव अलका घोडेकर, ललिता वर्पे, शांता थोरात, सरपंच उषा कानडे, गुलाब कानडे, ग्रामसेविका मंगल भोईर, ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा बाळासाहेब कानडे, अर्चना कोटकर व स्मिता देशपांडे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमापूर्वी कळंब गावातून महिलांच्या शिवार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने ३०० महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब यांच्यावतीने महिलांची शुगर, हिमोग्लोबिन तपासणी केली. कार्यक्रमाचे संयोजन कल्पना एरंडे, सुहास वाघ, सीमा कानडे, बायडाबाई लोहकरे, हरिभाऊ गेंगजे, सारिका भालेराव यांनी केले.


महिलांनी व्यवसाय उभारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. व्यवसाय करताना आत्मविश्वास, नियोजन व धाडस या तीन बाबी आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. महिलांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता उद्योग व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे
- सोमशेखर शेटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे