लोकसभा निवडणूक आंबेगाव महिला प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक आंबेगाव महिला प्रतिक्रिया

महाळुंगे पडवळ, ता. १३ : सरकारच्या कोणत्याही धोरणाप्रती नागरिकांची नाराजी व्यक्त करण्याचा निषेध हा एक मार्ग असला तरी, मतदान हे एखाद्याचा आवाज नोंदवण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन आहे. देशातील नागरिकांचा सामूहिक आवाज किंवा जनादेश हा बदलासाठी सर्वात मोठा आवाज असू शकतो. मतदाराची मतदान करण्याची जबाबदारी लोकशाहीच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य व विकासासाठी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
- स्मिता कानडे, महिला मतदार, कळंब

बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की, त्यांच्या एका मताने काही फरक पडत नाही आणि म्हणून ते मतदान करण्यासाठी येत नाहीत. देशातील नागरिकांना काम न करणाऱ्या सरकारला घरी बसविण्याचा मतदानाच्या रूपाने मिळालेला अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचे हे कर्तव्य पार पाडणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
- प्रीती थोरात, महिला मतदार, चांडोली बुद्रुक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com