चासला ३० हेक्टरवरील पिकांना फटका

चासला ३० हेक्टरवरील पिकांना फटका

Published on

महाळुंगे पडवळ, ता.२९ : डिंभे धरणातून घोडनदीपात्रात ३४ हजार ७० क्यूसेकने रविवारी (ता.२८) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चास (ता.आंबेगाव) येथील गावाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. येथील ७५ शेतकऱ्यांचे जवळपास २० ते ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
चास येथील घोडनदी लगत असलेले शेतकरी सदाशिव मानकर, वैभव भोर, दशरथ भोर, गणेश बनकर, श्रीकांत संत, प्रकाश संत, हेमंत संत, मारुती भोर, बाबूराव भोर, जयवंत भोर, अजित भोर, खंडू मंडलिक, रभाजी मंडलिक, बाजीराव भोर, पंढरीनाथ भोर, हनुमंत भोर, विलास चासकर, दीपक चासकर यांच्या शेतातील उभ्या पिकात पुराचे पाणी घुसल्याने ज्वारी, सोयाबीन, गुलाब फुले, आले, झेंडू, पिकांचे तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. होत्याचे नव्हते झाल्याने शेतकरी निराश झाला आहे. यामुळे शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी माजी सदस्या तुलसी सचिन भोर यांनी केली आहे.
दरम्यान, चास आणि कडेवाडी येथील स्मशानभूमीत पाणी घुसल्याने त्याचेही नुकसान झाले आहे, असे सरपंच अर्चना दौलत बारवे यांनी सांगितले.

मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचनचा वापर करून २५ गुंठे क्षेत्रात २२ दिवसापूर्वी झेंडू पिकाची लागवड केली होती. त्यासाठी रोपे, मजुरी व अन्य असा एकूण ३५ हजार रुपये खर्च केला होता. पुरामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
- गणेश बनकर, फूल उत्पादक शेतकरी

03368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com