कळंबमध्ये डॉक्टरांसह कर्मचार्ऱ्यांचा जीव धोक्यात

कळंबमध्ये डॉक्टरांसह कर्मचार्ऱ्यांचा जीव धोक्यात

Published on

विवेक शिंदे : सकाळ वृत्तसेवा
महाळुंगे पडवळ, ता. १४ : कळंब (ता.आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय श्रेणी १ दवाखान्याची इमारत मोडकळीस आली आहे. भिंतीना तडे गेले असून मोठ्या भेगा पडल्या आहेत. उंदरे, घुशी व अगदी सापांचा उपद्रव वाढला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांसह कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

पशुवैद्यकीय दवाखान्याची ६० ते ६५ वर्षापूर्वींची दवाखान्याची इमारत आहे. तीन छोट्या खोल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. नचिकेत कढाळे व शिपाई दशरथ देवराम घोटकर आहेत. या दवाखान्यामार्फत कार्यक्षेत्रात कळंब, एकलहरे, नांदूर, टाकेवाडी व कळंबई आदी गावे आहेत. या पाच गावात गाई, म्हैस व बैल आदी सुमारे तीन हजार ९३० जनावरे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जवळपास महिन्याला १०० ते १२० कृत्रिम रेतन केले जाते. एक ते दोन महिन्यातून एकदा वंधत्व निवारण, जंत निर्मुलन मोहीम राबविली जात आहे.


अशी आहे सद्यस्थिती
- दरवाजा उघडताना इमारत कोसळते की काय अशी अवस्था
- पाठीमागील खोलीत उंदरे, घुशी व अगदी सापांचा वावर
- औषधे व अन्य कागदपत्रांचे नुकसान होते.
- पावसाळ्यात दवाखाना गळत असल्याने डॉक्टरांसह, नागरिकांचे सर्वाधिक हाल
- गायरान जागा मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पाठविलेला प्रस्ताव लाल फितीत

यांची आहे गरज
- पाच गुंठे जागा अपेक्षित
- प्रशस्त नवीन इमारत
- स्वच्छतागृह व अन्य सुविधा
- दवाखान्यासभोवती सिमेंट काँक्रिटीकरणची आवश्‍यकता

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या.......... ४३०
वंध्यत्व निर्मूलन संख्या..........२१०

लसीकरण
लाळ्या खुरकूत ..........३६१५
लंपी.......... ४२३०
पीपीआर (मेंढी व शेळी)..........१४५०
रेबीज..........२५
घटसर्प ....... ७५०
फऱ्या ...... ९५
आंत्र विषार ....... ९६०

परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी, थायलेरिया, प्रोटोझोअल, मस्टायटीस

वैरण बियाणे वितरण..........मका, ज्वारी (५०० किलो ग्रॅम)

चारा उत्पादन क्षेत्र..........१०५० हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र.......... ८३० हेक्टर

वार्षिक चारा (टनांत)
हिरवा....... ९५३६०
वाळलेला....... ३९५० टन


पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागा फारच कमी आहे. दवाखान्यासाठी नवीन जागा मिळत नाही. पाच गावातील पशुधनाचा विचार करिता दवाखान्याची नवीन इमारत ही खूप महत्त्वाची आहे. जागेच्या प्रकरणाला शासन पातळीवर गती देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- डॉ. सचिन भालेराव, माजी उपसरपंच, कळंब

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून
घ्यावे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेबाबत ग्रामपंचायत आणि शासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. लवकर जागेचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
- डॉ. नचिकेत कठाळे, पशुधन विकास अधिकारी

03449, 03450

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com