माळशिरस परिसरात दूध उत्पादकांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळशिरस परिसरात दूध उत्पादकांची गैरसोय
माळशिरस परिसरात दूध उत्पादकांची गैरसोय

माळशिरस परिसरात दूध उत्पादकांची गैरसोय

sakal_logo
By

माळशिरस, ता,४ : परिसरात (ता. पुरंदर )वीज कर्मचाऱ्यांनी संप केल्याने पूर्व भागातील सर्वसामान्य नागरिकांची , शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. रात्री शेतीसाठी चालू असलेला विद्युत पुरवठा पहाटे बंद झाला. यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली.
राजुरी परिसरात दिवसा शेती करता होणारा विद्युत पुरवठा आज बंद होता, अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे जनावरांना पाणी,चारा कुट्टी करणे अवघड झाले, पोंढे येथे विद्युत पुरवठा लवकर सुरू होईल की नाही या भितीने पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लॅन्ट वर जादाचे पाणी भरून ठेवण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. नायगाव येथील प्रगतिशील शेतकरी व विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष संदीप खेसे यांनी सांगितले की, शासनाने आणलेले खाजगीकरण धोरणावर धोकादायक आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज वापरणे अवघड होईल व अगोदरच उत्पादन खर्च वाढल्याने तोट्यात चाललेली शेती शेतकऱ्यांना करणे अवघड होईल.