Sun, March 26, 2023

राजेवाडी येथे आज ‘स्वच्छ जिल्हा स्वच्छ मन अभियान’
राजेवाडी येथे आज ‘स्वच्छ जिल्हा स्वच्छ मन अभियान’
Published on : 25 February 2023, 8:59 am
माळशिरस, ता, २५ : राजेवाडी येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी (ता. २६) अमृत परियोजनाअंतर्गत ‘स्वच्छ जिल्हा स्वच्छ मन’ अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी जलाशय स्वच्छता आणि प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. जल संरक्षण आणि जल बचाव करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. राजेवाडी शाखेच्या वतीने पिसर्वे तलाव स्वच्छ करण्याचे ठरले असून त्यामध्ये जलसाठा, प्लास्टिक, कचरा, खराब अन्नपदार्थ इत्यादीचा निपटारा करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत संपूर्ण देशात जवळपास ११०० पेक्षा अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे राजेवाडी शाखेचे हनुमंत थोरात व सुनील बधे यांनी सांगितले.