अध्यक्षपदी महादेव शेंडकर; उपाध्यक्षपदी प्रवीण मारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी महादेव शेंडकर; उपाध्यक्षपदी प्रवीण मारणे
अध्यक्षपदी महादेव शेंडकर; उपाध्यक्षपदी प्रवीण मारणे

अध्यक्षपदी महादेव शेंडकर; उपाध्यक्षपदी प्रवीण मारणे

sakal_logo
By

माळशिरस, ता, ३ : शेंडकर पिंपरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव शेंडकर; तर उपाध्यक्षपदी प्रवीण मारणे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन अध्यक्ष विजय थेऊरकर व उपाध्यक्ष विठ्ठल शेंडकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सासवड येथील पुरंदर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे कार्यालयात संस्थेच्या विशेष सभेचे आयोजन केले होत.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.बी. धस यांनी काम पाहिले. अध्यक्ष पदासाठी महादेव शेंडकर व उपाध्यक्षपदासाठी प्रवीण मारणे यांचा एकमेव अर्ज आल्याने धस यांनी महादेव शेंडकर यांची अध्यक्षपदी व प्रवीण मारणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी संस्थेचे संचालक विजय थेऊरकर, संपत शेंडकर, विठ्ठल शेंडकर, बाबूराव शेंडकर, सुखदेव हंबीर, संतोष गायकवाड, अशोक सोनवणे, शंकर शेंडकर, महादेव मोघे, शीतल चव्हाण, शोभा हंबीर सदानंद थेऊरकर आदी उपस्थित होते.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, दत्ता चव्हाण, गंगाराम जगदाळे, अजिंक्य टेकवडे आदींनी शेंडकर, मारणे यांचे अभिनंदन केले. दरम्यान पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा भैरवनाथ मंदिरात सत्कार करण्यात आला.