‘आमदार साहेब बांधा आता घड्याळ’ 

पारितोषिक वितरण समारंभात आमदार जगताप यांच्यावर टिप्पणी

‘आमदार साहेब बांधा आता घड्याळ’ पारितोषिक वितरण समारंभात आमदार जगताप यांच्यावर टिप्पणी

Published on

माळशिरस, ता. १८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी आज सासवड येथील जाहीर कार्यक्रमात आमदार संजय जगताप यांच्यावर मिस्कील टिप्पणी केली. यात त्यांनी हातावर घड्याळ बांधण्याची साथ दिली.

माजी आमदार कै. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छ सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ सासवड येथे पार पडला. आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर व आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक संजय जगताप यांना एका दुःखद घटना प्रसंगी जावे लागल्याने त्याच्या अगोदर आमदार काळे व आसगावकर हे अगोदर कार्यक्रम स्थळी पोचले. याचा धागा पकडत आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विक्रम काळे हे आमदार जगताप यांच्याकडे पाहत हसत ‘आमदार साहेब तुमच टायमिंग चुकतंय, तुम्ही आता आमचं घड्याळ हाती बांधा,’ असे म्हणताच सभागृहात हाश्या पिकला. आमदार संजय जगताप यांनी हसत आपले दोन्ही हात जोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.