पाणी टंचाईवर मात करत घेतले ३०० किलोची उत्पादन

पाणी टंचाईवर मात करत घेतले ३०० किलोची उत्पादन

माळशिरस, ता.१२ : नायगाव (ता. पुरंदर) येथील संदीप खेसे व गणेश खेसे या बंधूंनी सलग तिसऱ्या वर्षी ठिबक सिंचनचा वापर करून टंचाईच्या परिस्थितीमध्ये कांदा बीज उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांना एक एकरामध्ये पाच पोती (तीनशे किलो) कांद्याचे बियाणे तयार केले आहे.

बिजोत्पादन घेताना लागवडी पूर्वीपासूनच पीक काढेपर्यंत सर्व ते नियोजनबद्ध केल्याने चांगले उत्पादन मिळाले असून, त्यांच्या या पीक नियोजनाचे व उत्पन्नाचे कौतुक होत आहे.

लागवडीची पूर्वतयारी -प्रथमतः त्यांनी शेत नांगरून दोन पाळ्या घालून जमीन भुसभुशीत केली व त्यामध्ये एकरी चार ट्रॉली शेणखत टाकले व ते मिक्स करून झाल्यानंतर चार फुटांवर ड्रीपचे लॅटरल अंथरूण घेतले व दोन्ही बाजूने १.५ फुटावर लागवड केली.
लागवडी पूर्वीचे खत व्यवस्थापन -लागवडी अगोदर एकरी १०० किलो डीएपी, ५० किलो एमओपी, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, १० किलो बेनसल्फ व बायोझाईम दाणेदार २५ किलो टाकले.

अशी करा बियाण्याची निवड
गोट कांद्यासाठी बियाणे किंवा कांद्याची निवड फार महत्त्वाची असते. लागवडीसाठी ओतूर येथून डबल पत्तीचा व शेंद्री रंगाचा कांदा खरेदी केला. कांदा हा एक सारख्या आकाराचा, एक डोळा व फाकटी विरहित असावा, असे गणेश खेसे यांनी सांगितले.

लागवडीनंतर खत व्यवस्थापन
गोट कांदे लागवडीपासून पंधरा दिवसाचे झाल्यानंतर एकरी १०० किलो महाधन २४ :२४ व मायकोरायझा ४ किलो प्रति एकर प्रमाणे रिंग मारून टाकले. दुसरा डोस लागवडीनंतर ५० दिवसांनी १०:२६:२६- १०० किलो, एम. ओ.पी-५० किलो टाकले. अधून-मधून पाणी देताना ड्रीप मधून १९:१९:१९, १२: ६१, १३:४०:१३, ०::५२:३४, ०:०:५० यासारखी विद्राव्य खते सोडली. मुळकुज होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, पोटॅशियम ह्युमाइट, पीएसबी, केएसबी पाण्यातून सोडले.

मधमाशांमुळे मिळाले अधिक उत्पादन
बोंडामध्ये चांगले बियाणे भरण्यासाठी परागीभवन प्रक्रियेत मधमाशांची आवश्यकता असते. मधमाशांची संख्या कमी दिसल्यामुळे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथून मधमाशांच्या दोन पेट्या विकत आणल्या व शेतामध्ये ठेवल्यामुळे बोंडांमध्ये चांगले बियाणे भरले व अधिक उत्पादन मिळाले.


गेल्या दोन वर्षापासून कांद्यामध्ये उत्पादन खर्च वाढत असून बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत व्हावी. या उद्देशाने अल्पदारात कांदा बियाण्याने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे.
-संदीप खेसे, कांदा बिजोत्पादन

01681

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com