आंबेगाव, भोर, वेल्हा, आंबेगावची पिछाडी

आंबेगाव, भोर, वेल्हा, आंबेगावची पिछाडी
Published on

माळशिरस, ता.३१ : मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार घातलेला असताना जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी पाहता ऐरवी पावसाबाबत आघाडीवर असणारे आंबेगाव, भोर, वेल्हा, जुन्नर हे तालुके दरवर्षी कमी पाऊस असणाऱ्या तालुक्याच्या मागे आहेत. या तालुक्यात दोनशे मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस शनिवारपर्यंत (ता.३१) मे महिन्यात पडला.
ऐरवी पाऊस कमी असणारे बारामती, दौड, शिरूर व त्यांच्याबरोबर मावळ तालुक्यात तीनशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३४२ मिलिमीटर पाऊस कालपर्यंत दौड तालुक्यात पडला आहे. तर कमी पाऊस वेल्हा तालुक्यात १४१ मिलिमीटर पडला आहे.
उन्हाळ्याचा शेवट असणाऱ्या मे महिन्यामध्ये नेहमी कायम स्वरूपी जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची नदी ,नाले ,बंधारे कोरडे असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असते. मात्र, यंदाचा मे महिना जिल्ह्यामध्ये या नेहमीच्या परिस्थितीला अपवाद ठरला आहे. मे महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये नेहमी पाण्याची टंचाई असणाऱ्या व कमी पाऊस पडणाऱ्या तालुक्यातच विक्रमी पावसाची नोंद होत सर्व नाले बंधारे भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील पश्चिम भागातील ज्यादा पावसाचा भाग असणाऱ्या भागातील धरणे भरल्यानंतर त्यातून सोडणाऱ्या पाण्याच्या विसर्ग यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढते. मात्र, प्रथमच कुठल्याही धरणातून पाण्याचा निसर्ग न सोडता केवळ उजनी धरणाच्या पश्चिमेला जिल्ह्यातील लगत असणाऱ्या तालुक्यांत विक्रमी स्वरूपाचा पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात पडल्याने ११ टीएमसी हून अधिक पाणी उजनी धरणामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये या पंधराव्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही दौंड तालुक्यामध्ये झाले असून या १५ दिवसांमध्ये ३४२ मिलिमीटर पाऊस कालपर्यंत या तालुक्यात पडलेला आहे. त्या खालोखाल ३२३ मिलिमीटर पाऊस बारामती, त्यानंतर मावळात ३१४ मिलिमीटर, शिरूरमध्ये ३१३ मिलिमीटर असे तीनशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस या चार तालुक्यात पडला आहे. त्यानंतर २०० मिलिमीटर वरून अधिक पाऊस इंदापुरात २९३, पुरंदरला २७६, हवेलीत २७०, मुळशीत २३४, खेडमध्ये २६९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर २०० मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांमध्ये वेल्हा तालुक्यात १४१ तर आंबेगावमध्ये १७७ तर जुन्नरमध्ये १८५ तर भोरमध्ये १९० मिलिमीटर पाऊस पडला.

बारामती, इंदापुरात नुकसानीची तीव्रता
जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा भाग असणाऱ्या दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यात कायमस्वरूपी सिंचनाची साधने असल्याने अधिक बागायती भाग आहे. याच ठिकाणी मे महिन्यात अधिकचा पाऊस झाल्याने नुकसानीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे.


मे महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथम चाऊस झाल्याने उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांचे नुकसान होण्याबरोबरच सर्वत्र शेतांमध्ये पाणी फुटल्याने पुढील पिकांचे नियोजन करण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येणार असून शेतीचे पूर्णता नियोजनच कोलमडून पडणार आहे.
- अतुल बोरकर, बोरकरवाडी, तालुका बारामती


३१ मेपर्यंत पडलेला तालुका निहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

तालुका.......पाऊस मिलिमीटर
हवेली.......२७०
मुळशी.......२३४
भोर.......१९०
मावळ.......३१४
वेल्हा.......१४१
जुन्नर.......१८५
खेड.......२६९

आंबेगाव.......१७७
शिरूर.......३१३
बारामती.......३२३
इंदापूर.......२९३
दौंड.......३४२
पुरंदर.......२७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com