पुणे
पिसर्वे हायस्कूलमध्ये कार्याला उजाळा
माळशिरस, ता. २८ : पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील पिसर्वे येथे डॉ. शंकरराव कोलते विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या
सर्वसाधारण सभेचे सदस्य विजय कोलते, शांताराम कोलते, सरपंच रवींद्र कोलते, स्थानिक स्कूल सल्लागार समिती अध्यक्ष अरुण कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत कोलते, संभाजी कोलते, संतोष कोलते, अर्जुन कोलते, जगनाथ झेंडे, माजी सैनिक विजय कोलते, पत्रकार अक्षय कोलते, महेश कोलते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गायकवाड यांनी केले.