नायगाव, पारगावात सायकलींचे वितरण
माळशिरस, ता. १९ : अक्षरसृष्टी संस्थेच्या वतीने पुरंदरमधील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये सायकल बँक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. २०) नायगाव येथे सहा, तर पारगाव येथे १६ सायकल वितरित करण्यात आल्या.
ज्या शाळेत विद्यार्थी संख्या १०० आहे, त्या शाळेसाठी किमान २५ सायकलींची बँक सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या आवाहनानुसार राजेवाडी (ता. पुरंदर) येथून हा उपक्रम सुरू करण्यात आला. दरम्यान, संस्थेच्या वतीने मागील दोन वर्षात माळशिरस, पिंगोरी, वाल्हे, हरणी, रिसे, पिसे, नायगाव, राजेवाडी, पारगाव, राजुरी, एखतपूर, मुंजवडी, खळद, वाळुंज, पांडेश्वर, पिंपरी, रोमनवाडी, पिसर्वे, मावडी, कुंभारवळण, यादववाडी, सटलवाडी, पिंपळे, जेऊर येथील शाळेत विविध देणगीदारांच्या सहकार्यातून एकूण १००० सायकलींचे वितरण संस्थेच्या माध्यमातून केले आहे. याचबरोबर दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोलर लॅम्पदेखील संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, गटविकासअधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ आदी उपस्थित होते.
02713
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

