‘पुरंदर उपसा’मुळे शेती होणार सुजलाम्‌ सुफलाम्‌

‘पुरंदर उपसा’मुळे शेती होणार सुजलाम्‌ सुफलाम्‌

Published on

माळशिरस, ता.७ : माळशिरससह नायगाव, राजुरी, रिसे, पिसे, पोंढे या वंचित भागात आता पुरंदर उपसा योजनेचे पाणी वितरिकेद्वारे पोचणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारे जलवाहिन्यांचे पाइप रविवारी (ता. ७) माळशिरस येथे पोचले. त्यांचे पूजन करून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मागील वीस वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आता लाभ क्षेत्रातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होणार आहे.


पुरंदर उपसा कार्यान्वित झाल्यानंतर मागील वीस वर्षांपासून माळशिरस परिसरात भागात वितरिका नसल्याने शेतकऱ्यांना ओढ्या वाटे लांबून पाणी आणावे लागत होते. तसेच राजुरी, रिसे, पिसे, खोपडेवाडी या पट्ट्यातील इतर गावात पुरंदर उपसा योजनेची जलवाहिनी अद्यापपर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे हे पाणी या भागात नव्याने वितरिका आणण्यासाठी अक्षर सृष्टी संस्थेचे प्रमुख सिद्धनाथ पवार यांच्या माध्यमातून माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्या प्रयत्नातून या गावांना वरदान ठरणारी एकूण सात किलोमीटर लांबीची ही पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील दोन किलोमीटर लांबीच्या व पावणेदोन कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असणारे पाइप आज माळशिरस येथे पोचले झाले. पहिल्या टप्प्यातील कामासाठी शरद पवार यांच्या खासदार फंडातून एक कोटी रुपयांचे पाइप येण्यास सुरुवात झाली. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती या कामासाठी तांत्रिक सहकार्य करणार आहे. सकाळ चॅरिटेबल ट्रस्टकडून जलवाहिनी खोदाईसाठी आवश्यक डिझेल व्यवस्था करणार आहे. जैन इरिगेशन, जळगाव, यांचे कडून यासाठी पाइप पुरवठा सुरू करण्यात आला.
दरम्यान, पाइप पूजनप्रसंगी अक्षर सृष्टी संस्थेचे प्रमुख सिद्धनाथ पवार, माळशिरसच्या सरपंच आरती यादव, माऊली यादव ग्रामपंचायत सदस्य सुखदेव मराठे, अंकुश बापू भगत, महेंद्र खोसे, नायगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत चौंडकर, पोंढेचे माजी उपसरपंच पंकज लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.


पाच किलोमीटरच्या जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी परिसरातील सर्व ग्रामस्थ मदतीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री व आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप यांना मदतीसाठी विनंती करणार आहेत. सर्वांच्या सहकार्यातून काम नक्कीच पूर्ण होईल व वंचित भागासाठी पाण्याचा कायमस्वरूपी विषय मार्गी लागेल.
सिद्धनाथ पवार, अक्षरसृष्टी संस्था प्रमुख
02732

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com