नागरिकांना ''लेक व्हायटींग''ची भुरळ

नागरिकांना ''लेक व्हायटींग''ची भुरळ

महुडे, ता. १३ ः ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाण्याने तळ गाठला असून धरणात १० टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा उरला आहे. त्यामुळे भाटघर धरणात आतील बाजूस ब्रिटिशांनी बांधलेले ''लेक व्हायटींग धरण'' आता दिसू लागले आहे. ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.

धरण बांधण्याच्या उद्देशाने सन १८८१ मध्ये इंग्रज राजवटीत उत्तर बाजूस संगमनेर (ता.भोर) गावच्या हद्दीपासून ते दक्षिण बाजूस भाटघर (ता .खंडाळा) गावच्या हद्दीपर्यंत १८ मीटर उंचीची भिंत बांधण्यास सुरुवात झाली होती. ११ वर्षांनी म्हणजे १८९२ साली भिंतीचे काम पूर्ण झालेल्या या धरणाला लेक व्हायटींग असे नाव देण्यात आले. लेक व्हायटींग धरणात ५.२० टीएमसी एवढा पाणीसाठा साठू लागला. परंतु हा धरणातील पाणी कमी पडू लागल्याने मोठे धरण बांधण्याच्या उद्देशाने धरणाच्या भिंतीलगत पूर्वेला ५७.९१ मीटर उंचीची भिंत बांधण्यात आली. या धरणाचे काम १९२७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर या धरणाला ''भाटघर धरण'' (येसाजी कंक जलाशय) असे नाव देण्यात आले. या भाटघर धरणात २३.७४ एवढा पाणीसाठा साठू लागला.

एप्रिल- मे महिन्यात दिसते ''लेक व्हायटींग''
भाटघर धरणाची भिंत ही लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीपेक्षा ३९.९१ मीटर उंच आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी लेक व्हायटींग धरणाच्या भिंतीच्या वर गेल्यानंतर लेक व्हायटींग धरण दिसेनासे होते. मात्र दरवर्षी एप्रिल- मे महिन्यात भाटघरच्या पाण्याची पातळी ५.२० टीएमसी पेक्षा कमी झाल्यानंतर लेक व्हायटींग धरण दिसू लागते.

दोन पांडवकालीन मंदिरे
भाटघर धरण बांधण्याअगोदर पांडव काळात दक्षिण बाजूस वेळवंड गावच्या हद्दीत नागोबा मंदिर तर उत्तर बाजूस कांबरे गावच्या हद्दीत कांबरेश्वर मंदिर बांधण्यात आली होती. ही दोन्हीही मंदिरे पाऊस काळात धरणाच्या पाण्यात बुडत असतात. साधारण दहा महिने ही दोन्ही मंदिरे पाण्याखाली असतात. परंतु एप्रिल -मे महिन्यात धरणाची पाण्याची पातळी खालावल्यावर ही मंदिरे दिसू लागतात. यावेळी ही मंदिरे बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

00700

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com