सभापती केसरीचे बकासूर, लखन मानकरी

सभापती केसरीचे बकासूर, लखन मानकरी

महुडे, ता. ८ : पोम्बर्डी (ता.भोर‌) येथे सोमवारी (ता. ३) सभापती केसरी ओपन मैदान बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यामध्ये नाथसाहेब प्रसन्न सुसगाव बैलगाड्याच्या बकासूर व लखनने प्रथम क्रमांक पटकावला. ते सभापती केसरीचे मानकरी ठरले.

शर्यतीत सुमारे ३०० बैलगाडे धावले. ग्रामस्थ मंडळ पोम्बर्डी व स्वप्नीलभाऊ जाधव युवा मंच भोर, राजगड, मुळशी यांच्या वतीने शर्यतीचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांकाचे एक लाख ११ हजार १११ रुपये रोख व चांदीच्या दोन गदाचे बक्षीस भोर पंचायत समितीच्या माजी सभापती दमयंती जाधव यांच्या हस्ते गाडा मालकांना देण्यात आले. द्वितीय क्रमांक गुरुदत्त प्रसन्न दरेवाडी पुणे यांना ७७ हजार ७७७ रोख व दोन ढाली, तृतीय क्रमांक वाघजाईमाता प्रसन्न घोटावडे मुळशी यांना ५५ हजार ५५५ रोख व दोन ढाली, चौथा क्रमांक श्रीनाथ प्रसन्न चांबळी यांना ४४ हजार ४४४ रोख व दोन ढाली, पाचवा क्रमांक पैलवान पिसे पठारवाडी यांना ३३ हजार ३३३ रोख व दोन ढाली, सहावा क्रमांक यल्लमा प्रसन्न सुपे यांना २२ हजार २२२ रोख व दोन ढाली यल्लमा प्रसन्न, सातवा क्रमांक आई एकवीरा प्रसन्न सातारा यांना ११ हजार १११ रोख व दोन ढाली अशा स्वरूपाच्या बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गट पास करणाऱ्या गाडीला २००१ रुपये रोख व दोन ढालींचे बक्षीस मिळाल्याने बैलगाडा मालकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, बैलगाडा शर्यतींबरोबरच भोलावडे येथील आर. आर. विद्यालयाच्या ग्राउंडवर झालेल्या सभापती चषक क्रिकेट स्पर्धेत हिटर बॉईज यांनी प्रथम तर शिवयोद्धा इलेवन संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज बक्षीस वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर मांडेकर, युवा मंचचे स्वप्नील जाधव, उद्योजक राजेंद्र आंग्रे, भोर राजगड मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, बैलगाडा प्रेमी, पोम्बर्डी ग्रामस्थांसह महिलांचा सहभाग होता.

00764

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com