बसरापूर येथे भाटघर धरणाच्या किनाऱ्यावर बंदी

बसरापूर येथे भाटघर धरणाच्या किनाऱ्यावर बंदी

महुडे, ता.६ : बसरापूर (ता.भोर) येथे भाटघर धरणाच्या किनाऱ्यालगत रात्री सात ते सकाळी सातपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा ठराव नुकसातच ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच वेळवंडी नदीलगतचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन तसेच पोलिस पाटील अहवाल भोरचे तहसीलदार सचिन पाटील व भोरचे पोलिस निरीक्षक अण्णा पाटील यांना शुक्रवारी (ता.५) देण्यात आला.


धरणाच्या वेळवंडी नदीची पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या नदीच्या सभोवतालचा परिसर मोकळा झाला आहे. हा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची खूप गर्दी होते. पर्यटक, मद्यपी, प्रेमीयुगुल तरुण-तरुणी, रात्री अपरात्री बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची शनिवारी, रविवारी आणि सरकरी सुट्टी दिवशी मोठी गर्दी होते. यावेळी अनेकजण धरणाचे पाणलोटक्षेत्र, सूर्योदय, सूर्यास्त पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. सध्या धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना आपल्या जिवास मुकावे लागले आहे.
दरम्यान, भविष्यातील धोका लक्षात घेता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री सात ते सकाळी सातपर्यंत या नदीच्या किनाऱ्यावर फिरायला व गावच्या हद्दीतील मागील रस्त्यावरून रात्री सातनंतर नदीला जाण्यासाठी मनाईची मागणी केली असून, ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, निवदेन देताना सरपंच नीलम झांजले, उपसरपंच रामदास झांजले, पोलिस पाटील विठ्ठल झांजले व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्थानिक महिलांना नाहक त्रास
बसरापूर येथील नदी पात्रालगत रात्री- अपरात्री, उशिरा बेधुंदपणे मद्यपी तसेच पार्टी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचा नाहक त्रास अनेक स्थानिक महिलांना होत आहे. अनेक जण भांडण करून दमदाटी करून ग्रामस्थांना नाहक त्रास देत असतात. यामुळे प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे.


ग्रामस्थांचा ठराव व निवेदन प्राप्त झाले असून, पोलिस ठाण्याचा अहवाल मागितला आहे. नागरिकांना पर्यटकांच्या होणाऱ्या नाहक त्रासापासून सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून योग्य कारवाई केली जाईल.
- सचिन पाटील, तहसीलदार भोर

वेळवंडी नदी किनारी आमची दिवसा व रात्रीची गस्तीची वाहने नेहमी फिरत असते कित्येक वेळा अनेकांना आम्ही या ठिकाणाहून‌ पिटाळून लावले आहे. ग्रामस्थांचे निवेदन व पोलिस पाटलांचा अहवाल मिळाला असून, पुढे वरिष्ठ पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- अण्णा पवार, पोलिस निरीक्षक भोर

00869

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com