भोर तालुक्यात नाचणीच्या लागवडीत घट

भोर तालुक्यात नाचणीच्या लागवडीत घट

Published on

महुडे, ता.७ : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे भाताबरोबरच नाचणी लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. नाचणीचे क्षेत्र पूर्वी पेक्षा निम्म्याने कमी झाले आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम भागातील डोंगर उतारावर नाचणीची सुमारे १२८५ हेक्टरवर लागवड केली जातेय. त्यासाठी यावर्षी ६५ हेक्टरवर रोपवाटिका टाकली आहे.

प्रामुख्याने नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी भागातील रिंगरोड आणि भोर-महाड रोडवरील गावात तर भाटघर धरण खोऱ्यातील वेळवंड आणि भुतोंडे विभागातील डोंगरी गावात नाचणीची लागवड केली जाते. नाचणीच्या लागवडीसाठी मार्च, एप्रिल महिन्यात डोंगरउतारावरील जमिनीतील जाळीजळी झाडेझुडपे तोडून ती जाळून जमिनीची नांगरणी करून जमीन तयार करून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवरच नाचणीचे बी पेरले जाते.
यंदा जून संपत आला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नाचणीसह भाताची लागवड रखडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या जोरावर हिर्डोशी खोऱ्यात नाचणी लागवड करण्यास सुरुवात केली आहे. नाचणीची लागवड करताना मजुरांचा खर्च, जाणारा वेळ हा न परवडणारे असल्याने नाचणी पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लागवडी दरम्यान, जमिनीची होणारी धूप, नांगरणीसाठी झाडे झुडपे तोडून जाळली जातात. त्यामुळे काही वेळा पशुपक्ष्यांची घरटी जळतात अथवा नुकसान होते. यामुळे शेतकरी नाचणी पीक घेण्याचे टाळतो. पूर्वी तालुक्यात सुमारे २ हजार ९०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जात होती. सध्या १२८५ हेक्टरवरच नाचणी घेतली जाते, असे हिर्डोशीचे शेतकरी दीपक भागूजी धामुणसे यांनी सांगितले

00874

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.