भोरमध्ये खरिपाच्या पेरण्या रखडल्या
हिर्डोशी, ता.१२ : भोर तालुक्यातील खरीप हंगामातील सरासरी असलेल्या एकूण १७ हजार ६२४ हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ४४.१ टक्के पेरणी झाली आहे. मे महिन्यापासून सुरू झालेल्या सततच्या पावसाने शेती मशागतीची कामांबरोबरच पेरण्या रखडल्या. यावर्षी भुईमूग ३८.९ तर सोयाबीनची ५४.८ टक्के पेरणी झाली अजून बऱ्याच ठिकाणी पेरण्या झाल्या नसल्याने काही शेतकऱ्यांना पिके घेता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
जून महिन्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा,उडीद आदी कडधान्ये पिकांची पेरणी केली जाते. परंतु यावर्षी सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिले असल्याने जमिनीला वापसा नसल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. नांगरटी करता आली नसल्याने शेतात गवत झाले आहे. शेण खतही पसरवता आले नाही. जवळपास महिना होऊन गेला तरी पेरण्या झाल्या नाहीत. पेरणी झालेल्या पिकांची उगवणही झाली नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत त्यामुळे काही पिके आता घेता येणार नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उत्रौली, वडगाव डाळ, खानापूर, येवली, भोलावडे, शिंद या परिसरात तसेच विसगाव खोऱ्यासह तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. विकत आणलेले बियाणे घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी पेरण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातूनही पेरणी झालीच तर उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
दरवर्षी भात लावणीपुर्वीच सोयाबीन, भुईमूग घेवडा आदी खरीप पिकांच्या पेरण्या जूनच्या १५ तारखेपर्यंत उरकल्या जातात. परंतु,यंदा मे महिन्यात सुरू झाल्यापासून थांबलाच नाही. त्यामुळे मशागती व पेरण्या करता आल्या नाहीत. महागाईचे बियाणे घरात पडून आहे. हंगाम संपला असल्याने यंदा पीक घेता येणार नसल्याने माझ्या सहीत बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून शासनाने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी.
- संजय डाळ, शेतकरी वडगाव डाळ
दृष्टिक्षेपात भोर तालुका खरीप पीक पेरणी
(१० जुलैपर्यंत - क्षेत्र हेक्टर मध्ये)
पिकाचे नाव.......सरासरी क्षेत्र.......पेरणी झालेले क्षेत्र.......टक्केवारी
भात.......७५००.......३१५०.......४२.०
नाचणी.......१३२८....... ५३६.......४०.३
भुईमूग.......२४००.......९३३.......३८.९
सोयाबीन.......३३००.......१८०८.......५४.८
----------------------------
तृणधान्ये.......९५६३.......४१४९.......४३.४
कडधान्ये.......७४१.......४४४.......५९.९
अन्नधान्ये.......१०३०४.......४५९३.......४४.६
उसासह क्षेत्र.......१६६२४.......७३३४.......४४.१
चारा पिके.......१०००.......४३६.......४३.६
02167
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.