बारे परिसरातील विद्यार्थिनींना सायकल वाटप

बारे परिसरातील विद्यार्थिनींना सायकल वाटप

Published on

महुडे, ता. २२ : बारे बुद्रुक (ता. भोर) येथील बारे-म्हाळवडी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुण्यातील आंतरराष्ट्रीय महिला संघटना (इनर व्हील क्लब) यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) अठरा सायकलींचे वाटप करण्यात आले. यासाठी इनर व्हील क्लबच्या पूना नॉर्थच्या अध्यक्षा प्रतिभा पानसरे, माजी अध्यक्षा सायली देशमुख, बाणेर हिल्स क्लबच्या अध्यक्षा रश्मी मिश्रा, पिंपरी क्लबच्या अध्यक्षा सविता इंगळे, सचिव अनिंदिता मुखर्जी व पुणे इंटेरियर क्लबच्या माजी अध्यक्ष तथा खजिनदार साक्षी निकम यांच्या माध्यमातून व म्हाळवडीचे युवा उद्योजक राजेश बोडके यांच्या प्रयत्नातून सायकल वाटप करण्यात आले.
राष्ट्रगीत, दीपप्रज्वलन व स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी म्हाळवडीचे सरपंच दत्तात्रेय बोडके यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करून मान्यवरांचा सत्कार केला. देशमुख म्हणाल्या की, या भागातील विद्यार्थ्यांसाठी जर्मन व फ्रेंच भाषा शिकवण्याचा मानस असून, क्लासेस कक्षातून शिकवण्यासाठी मदत करण्यात येईल, तसेच इंग्रजीविषयी ऑनलाइन क्लासेस घेण्यात येतील.
या वेळी क्लबच्या इंगळे, मिश्रा, मुख्याध्यापक कैलास कैलास खुटवड, राजेश बोडके, माउली बदक यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक बजरंग सापे यांनी प्रास्ताविक तर कल्पना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा बोरसे यांनी आभार मानले. दोन तीन किलोमीटरहून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. दरम्यान, राजेश बोडके युवा मंच यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य, तर माजी सरपंच सोपान दानवले यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी सरपंच जयश्री वेदपाठक यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com