सर्व्हर डाऊन की ई पीक पाहणीकडे पाठ?

सर्व्हर डाऊन की ई पीक पाहणीकडे पाठ?

Published on

हिर्डोशी, ता.२९ : खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाल. परंतु अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने मुदत वाढवून २० सप्टेंबर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ जाहीर केली. मात्र, तहसील विभागाकडून वेळोवेळी आवाहन करूनही भोर तालुक्याच्या ९ मंडलातील २०० गावांमधून २.१९ टक्के ई पीक पाहणी झाली आहे.

नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीकडे पाठ फिरवली आहे की काय? किंवा शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवरील सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. भोर तालुक्यातील १, ७१,६३६ एवढ्या पीक पाहणी करावयाच्या प्लॉटच्या संख्येपैकी अवघ्या ३,७५१ प्लॉटची ई पीक पाहणी झाल्याची २४ सप्टेंबरच्या ई पीक पाहणी अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येतेय. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे मोबाईल ॲपवरील ई पीक पाहणी करताना अडचणी येत आहेत. ई पीक पाहणी साठी प्रयत्न केल्यावर मोबाईलवर ‘खाता अपडेट करा’ आणि ‘काही तरी चुकीचे झाले आहे, पुन्हा प्रयत्न करा’ असे दिसत असल्याने वारंवार प्रयत्न करूनही यशस्वी होत नसल्याने वेळ व श्रम वाया जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रत्येकाकडे नसलेला स्मार्टफोन, ॲप वापरण्याचे नसलेले तांत्रिक ज्ञान, नेटवर्कच्या अडचणी यामुळे शेतकरी त्रासले असून त्यातूनच ते नोंदणीत मागे पडले आहेत.

वीस गावातून पाहणी शून्य
यात अभेपुरी, आशिंपी, कुंबळे, कोंडगाव, जयतपाड, डेहेण, तळजाईनगर, नांदघुर, नानावळे, बोपे, भाबवडी, साळुंगण, पांगारी कोळेवाडी, निळकंठ, पाले, करंदी खुर्द, कांबरे बुद्रुक, जोगवडी, वाढाणे या वीस गावातून ई पीक पाहणी शून्य आहे.

सर्वाधिक ई पीक पाहणी
कुंड येथे ७३ पैकी ३८ (५२.०५ टक्के), बसरापूर १५२ पैकी ४६(३०.२६ टक्के), भानुसदरा ७१ पैकी १९(२६.७६ टक्के) सर्वाधिक ई पीक पाहणी झाली आहे. कर्नावड,टिटेघर व कोंढरी या तीन गावातून शंभरहून अधिक शेतकऱ्यांची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वतःच्या शेतीची पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपच्या माध्यमातून करून घ्यावी. ॲपमध्ये सुरवातीला अडचणी येत होत्या. परंतु आता सुरळीत झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना समस्या आहेत त्यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, कोतवाल आदी शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.
- राजेंद्र नजन, तहसिलदार भोर

मंडल निहाय झालेली ई पीक पाहणी
मंडलाचे नाव...........गावांची संख्या...........अपेक्षीत ई पीक पाहणी...........झालेली ई पीक पाहणी...........टक्केवारी)
आंबवडे...........३१...........३४६८२...........७९७...........२.२९
किकवी...........१६...........१८७९३...........२३०...........१.२२
नसरापूर...........१९...........१८१६७...........४६६...........२.५६
निगुडघर...........३२...........१६११२...........५८१...........३.६०
बारे बुद्रुक...........२७...........१६८२३...........२२०...........१.३०
भोर...........१८...........२४९३०...........२४६...........०.९७
वेळू...........१४...........१५१७०...........४४९...........३.२८
संगमनेर...........२१...........१९८०२...........४४१...........२.२३
हर्णस...........२२...........१६४५९...........२७१-१.६४

02568

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com