उत्रौलीतील श्वेताची लंडनमधील अभ्यासक्रमासाठी निवड
हिर्डोशी, ता. ८ : उत्रौली (ता. भोर) येथील श्वेता शिंदे हिची क्रॅनफील्ड युनिव्हर्सिटी लंडन येथे एमएससी इन एरोस्पेस व्हेईकल डिझाईन अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या निवडीबाबत तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भोरमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलेल्या श्वेताने दहावीत ९५.६० टक्के गुण प्राप्त करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. तर बारावीत ९४ टक्के गुण प्राप्त केले होते. त्यानंतर पनवेल एमिटी युनिव्हर्सिटी मध्ये बी टेक एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी ५० टक्के शिष्यवृत्ती मिळाली. या पदवी अभ्यासक्रमा दरम्यान तिला संरक्षण मंत्रालय डीआरडीओ खडकी, पुणे आणि इस्त्रोमध्ये इंटर्नशिपची संधी मिळाली. इस्त्रोमध्ये लाइव्ह स्पेस डॉकिंग प्रोजेक्टमध्ये सक्रिय योगदान दिले. पदवीमध्ये तिने सुवर्णपदकही पटकाविले. यामध्ये शिक्षिका असलेली आई वैशाली शिंदे आणि वडिल सनील शिंदे यांचे पाठबळ मिळाले.
एरोस्पेस व्हेईकल डिझाईन म्हणजे विमान आणि अवकाशयानासारख्या वाहनांची रचना, विकास आणि उत्पादन प्रक्रिया होय. यामध्ये एरोस्पेस, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियंत्यांची एक टीम मिळून वाहनांची उद्दिष्ट्ये, कार्यक्षमता आणि सुरक्षितता यांसारख्या गरजा पूर्ण करते. यात प्रामुख्याने डिझाईन संकल्पना तयार करणे, विश्लेषण करणे आणि आवश्यक तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे यांचा समावेश आहे.
पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स येथे आठवीत असताना भेट देण्याच्या संधीने अवकाश आणि विमान अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली. शालेय निवड प्रक्रियेद्वारे खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची मुलाखत घेण्याच्या मिळालेल्या संधीत त्यांच्याशी झालेल्या प्रेरणादायी संवादामुळे अंतराळाविषयीची आवड निर्माण झाल्याने याच क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार केला. या निर्णयाला आई वडिलांनी दिलेली प्रेरणा आणि प्रोत्साहन यामुळेच इथपर्यंतची यशस्वी वाटचाल करता आली.
श्वेता शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.