भोरमध्ये समाधानकारक शिक्षक बदल्या
हिर्डोशी, ता. २० : महाराष्ट्र शासनाच्या सुधारित शिक्षक बदली धोरणानुसार नुकत्याच झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत भोर तालुक्यातील ९६ शिक्षकांची तालुकांतर्गत तर १०८ शिक्षकांची तालुकाबाह्य बदल्या झाल्या आहेत. भोरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या सुक्ष्म नियोजनाने तालुकांतर्गत बदल्या व इतर तालुक्यातून भोरला बदलून आलेल्या ११४ शिक्षकांबाबत समाधान व्यक्त होत आहे.
तालुकाबाह्य भोर विकास गटात बदलून आलेल्या ११४ पैकी १०० शिक्षक हे रुजू झाले आहेत. तर १४ शिक्षक अद्याप रुजू झाले नाहीत. केंजळे येथे गेली दहा-बारा वर्षे मुख्याध्यापक पद सततच्या पाठपुराव्यामुळे मान्य झाले. त्यामुळे प्रथमच तालुक्यातील सर्व मंजूर पदांवर मुख्याध्यापक रुजू झाले आहेत. बामणे यांनी कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र एकबोटे, लिपिक प्रमोद गोधडे व विजय काळे, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे व हुमेरापरवीन शेख, सर्व केंद्रप्रमुख यांच्या सहकार्याने बदली प्रक्रियेमध्ये समतोल राखत शिक्षकांची पदे रिक्त राहणार नाही याची काळजी घेतली. जीवन शिंदे, नेताजी कंक व योगेश शिंदे यांनी तालुका बदली कक्षाची कार्य पार पाडले.