भात काढणीसाठी गावी निघालेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला
हिर्डोशी, ता.५ : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरी (ता. महाड, जि. रायगड) हद्दीतील एका वळणाजवळील साइडपट्टीवरून दुचाकी दरीच्या बाजूला कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
शिवाजी दाजी डेरे (वय अंदाजे ५०, रा. शिळिंब, ता. भोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी डेरे हे भात काढणीसाठी मुंबईहून महाड वरंधमार्गे गावी शिळिंबला दुचाकी (क्र.एमएच ४६-आर १३१०) वरून येत होते. वरंधा घाटातील माझेरी हद्दीतील अवघड तिन्ही वळणे पार केल्यावर भोरच्या दिशेने जाताना त्यांची दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या साइडपट्टीवरून दरीच्या बाजूला कोसळली. यात दुचाकी दरीच्या उतारावर झुडपात अडकली मात्र, डेरे तेथून खालच्या बाजूला अंदाजे १०० फूट असलेल्या दुसऱ्या वळणावरील रस्त्यावर पडले. डोक्याला जोराचा मार लागल्याने डेरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच शिरगाव रेस्क्यू टीमचे अक्षय धुमाळ यांनी घटनास्थळावर पोहोचून माझेरी पोलिस पाटील व महाड पोलिसांना अपघाताची माहिती कळवली. घटनास्थळी पोहोचून महाड एमआयडीसी पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी महाडला पाठवण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मयत डेरे यांचे वडील व लहान भाऊ सतीश यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्यात मुंबईपासून प्रवास करत येऊन राहिलेल्या अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील घरी पोहोचायच्या आतच शिवाजी यांचे अपघाती निधन झाल्याने शिळिंबसह हिरडस मावळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
2748
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

