शेतकऱ्यांना भात मळणी यंत्राची प्रतीक्षा
हिर्डोशी, ता.१२ : बसरापूर, हिर्डोशी (ता. भोर) परिसरात भात काढणीला वेग आला आहे. सध्या शेतकरी भात काढणीत व्यग्र आहेत. कापणी केल्यावर भात मळणीसाठी यंत्राचा वापर सर्रास करताना शेतकरी दिसत आहेत. त्यामुळे मळणी यंत्राचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना यंत्राची प्रतीक्षा करावी लागत आहे.
भात कापणीला मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने मिळेल त्या मजुरांसह शेतकरी कुटुंबातील सदस्यांकडून कापणी करून घेत आहे. कापलेल्या यंगा गोळा करत भारे बांधून खाचरात अथवा सोईच्या ठिकाणी प्लॅस्टिक ताडपत्रीवर रचून मशिनच्या सहाय्याने मळणी करत आहे. परंतु सर्वत्र भात काढणी व मळणीची कामे सुरू असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर मळणी यंत्र मिळत नाही. त्यामुळे मळणी यंत्राची वाट पाहताना शेतकऱ्यांची रखडपट्टी होत आहे. वेळप्रसंगी रात्री उशिरापर्यंत यंत्राच्या साह्याने मळणी करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तर छोटे उत्पादक शेतकरी मजुरांचा व कुटुंबांतील सदस्यांचा वापर करून हाताने झोडणी करत आहेत. मळणीनंतर काही शेतकऱ्यांना ऊन देऊन भात वाळवावे लागत आहे. तसेच पाणी असलेल्या भात खाचरात कापणी करताना अडचणी येत असल्याने अशा ठिकाणी हार्वेस्टरची मागणी वाढू लागली आहे. हार्वेस्टरला पोत्याला २०० रुपये तर मळणी यंत्राच्या सहाय्याने भात मळणीसाठी एका भाताच्या पोत्याला १५० रुपये घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचा पुढील पंधरावडा भात काढणी, मळणीत जाणार आहे.
02769
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

