बसरापूर येथे पर्यटकांची वर्दळ
महुडे,ता.२९ : नाताळच्या सुट्ट्यांतील रविवारचा दिवस साधून भोर शहरालगत असलेल्या बसरापूर (ता. भोर) येथील भाटघर धरणाच्या किनाऱ्यावर रविवारी (ता.२८) दिवसभर पर्यटकांची वर्दळ वाढल्याने धरण किनारा गजबजून गेला होता.
सध्या सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटक भटकंतीसाठी बाहेर पडत असून भोर शहरापासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरापूर येथील धरण किनाऱ्यावर भोरकर गर्दी करताना दिसत आहेत. किनाऱ्यावर सेल्फी, छायाचित्रे काढणे, धरण दृष्य पाहणे, काठावर बसून निसर्गसौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद घेत आहेत. रविवारी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीचे प्रमाण जास्त दिसून आले. बसरापूर गावाचा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्टी दिवशी या भागांत फिरणारे पर्यटक, व्यावसायिक छायाचित्रण करणारांची नेहमीच गर्दी असते.
2937

