पाण्यामुळे भोरसह पूर्वेकडील भागातील शेती बहरणार

पाण्यामुळे भोरसह पूर्वेकडील भागातील शेती बहरणार

Published on

हिर्डोशी, ता.१३: भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ऑगस्टमध्येच भरली होती. भाटघर धरणाची २३.७४ टीएमसी साठवण क्षमता आहे. या धरणात ८८.९२ टक्के तर ११.९१ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात ९६.५६ टक्के असा मुबलक पाणीसाठा सोमवारी (ता.१३) सकाळपर्यंत उपलब्ध होता. मुबलक पाणी साठ्यामुळे भोरसह पूर्वेकडील भागाला शेती बहरण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

भाटघर धरणात २९ डिसेंबरला ९८.२३ टक्के तर नीरा देवघर मध्ये ९८.०० टक्के पाणी साठा होता. त्यातील भाटघर धरणातून २९ डिसेंबरपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात १० टक्के पाणी साठी कमी झाला आहे. तर नीरा देवघर धरणातून अद्याप विसर्ग सुरू केला नसल्याने जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १३ जानेवारीला भाटघर धरणात ८३.७६ टक्के तर नीरा देवघर धरणात ८१.९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर धरणात ५ टक्के व नीरा देवघर धरणात जवळपास १५ टक्के अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे. जानेवारी महिना निम्मा संपत आला तरी दोन्ही धरणातील उपलब्ध पाणीसाठा मागील काहीवर्षांच्या तुलनेत जास्त असल्याने यंदा तालुक्यासह पूर्वेकडील गावांतील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही असे शिल्लक पाणी साठ्याच्या आकडेवारी वरून दिसून येतेय. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती. दोन्ही धरणातील पाण्याचा भोर,बारामती, इंदापूर, पुरंदर, फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांसाठी उपयोग होत असतो.

लाभक्षेत्र
नीरा डावा कालवा
- लांबी १५२ किलोमीटर
- तालुके- पुरंदर, बारामती, इंदापूर
- एकूण लागवडीलायक क्षेत्र - ६८ हजार ७६७ हेक्टर
- एकूण सिंचन क्षेत्र - ३७ हजार ०७० हेक्टर

नीरा उजवा कालवा
- लांबी- १६९ किलोमीटर
- तालुके- खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला
- एकूण लागवडीलायक क्षेत्र - १ लाख ३० हजार ०२७ हेक्टर
- एकूण सिंचन क्षेत्र - ६५ हजार ५०६ हेक्टर

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा टक्केवारी (१३ जानेवारी )
धरण..........२०२५..........२०२६
भाटघर..........८३.७६..........८८.९२
नीरा देवघर..........८१.९३..........९६.५६
वीर..........६३.०७..........६१.४७
गुंजवणी..........८७.७८..........९३.४४

02985

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com