फलक लेखनातून कलेचे संवर्धन
हिर्डोशी, ता. २२ : जागतिक हस्ताक्षर दिन हा २३ जानेवारीला साजरा करतात. या डिजिटल युगात हस्ताक्षर कला लोप पावते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना भोलावडे (ता. भोर) येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील कलाशिक्षक विश्वास श्यामराव निकम हे गेल्या अनेक वर्षांपासून फलक लेखनातून कलेचे संवर्धन करत आहेत.
सुंदर हस्ताक्षर व चित्रे रेखाटून दररोज शाळेच्या फलकावर दिनविशेषाद्वारे बनविलेल्या सुबक कलाकृतीतून देश, राष्ट्र, सण, महापुरुषांच्या प्रती आत्मीयता जपण्याचे काम तसेच हस्ताक्षर व कलेविषयी प्रेरित करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून निकम करत आहेत. निकम दररोज रेखाटत असलेल्या आकर्षित फलकाला तालुक्यात सोशल मीडियावर स्टेटसच्या माध्यमातून चांगलीच पसंती मिळत आहे. यातून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
लहानपणापासून कला क्षेत्राची आवड असलेल्या निकम यांना आपल्या हातनोली (ता. तासगाव) गावात कला शिक्षका अभावी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती मिळत नसल्याने त्यांना शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे परीक्षेची फी भरता आली नाही. त्यामुळे आठवीत शासकीय चित्रकला परीक्षेला बसता आले नव्हते. नववीत असताना एलिमेंटरी परीक्षेत ‘ब’ श्रेणी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्यांची कला बहरत गेली. ए. टी. डी. झाल्यानंतर १९८९ ला कलाशिक्षक म्हणून राजा रघुनाथराव विद्यालयात रुजू झाले. ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा सुरू झाल्यापासून विद्यालयात आयोजन करण्यात ते अग्रेसर असतात. यांसह विविध स्तरावरील स्पर्धेत त्यांचे विद्यार्थी भाग घेत यश संपादन करतात.
राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. राज्यस्तरीय अक्षर संमेलन सलग चार वर्षे सहभाग व लेखनकार म्हणून सन्मान, ‘माझी शाळा माझा फळा’ समुहामध्ये सातत्याने सहभाग घेऊन शाळेचे तसेच भोरचे नाव उंचविण्यात निकम यांचे योगदान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

