जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये कुलकर्णी स्कूलचे ''तिरंगा'' द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये कुलकर्णी स्कूलचे ''तिरंगा'' द्वितीय
जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये कुलकर्णी स्कूलचे ''तिरंगा'' द्वितीय

जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये कुलकर्णी स्कूलचे ''तिरंगा'' द्वितीय

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ५ : येथील (ता.जुन्नर) ग्रामोन्नती मंडळ संचलित अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या तिरंगा या नाटकाने जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला. पुणे येथे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धा आयोजित केली होती.
स्पर्धेत तिरंगा नाटकाचे दिग्दर्शक, शिक्षक चिराग शेळके यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला. नाटकातील निरंजन कानडे, ईश्वरी कानडे यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी दिली. तिरंगा नाटकात आशुतोष नवले, श्रेयस विधाटे, अदिती गायकवाड, समर्थ वारुळे, श्रीराम गाढवे, श्रेयश दुबळे, शौर्य जाधव, वेदांत कुलकर्णी, ईश्वरी कानडे, आयुष वाव्हळ, जयंत खेबडे, सर्वेश भालेराव, सुधांशू मेहेर, निरंजन कानडे, श्रेया कानडे, आयुष विधाटे, ओजस्वी सराईकर, स्पंदन पाठक, सिद्धार्थ खांडगे या विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केला. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

03325