श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी डेरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी डेरे
श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी डेरे

श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी डेरे

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १६ : श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी डेरे यांची; तर उपाध्यक्षपदी शशिकांत वाजगे यांची बिनविरोध निवड झाली.
आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी गुरुवारी (ता. १६) दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सचिन सरसमकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी संचालक अमित बेनके, सुनील श्रीवत, अनिल थोरात, राजश्री बेनके, विजया उनकुले, यल्लू लोखंडे, विजय घोगरे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने, नवनाथ चौगुले, दयानंद डुंबरे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे डेरे व वाजगे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सरसमकर यांनी जाहीर केले. या वेळी
पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी विशाल भुजबळ, बाळासाहेब सदाकाळ यांची निवड केली.
आमदार बेनके म्हणाले, ‘‘माजी आमदार वल्लभ बेनके यांनी सन १९८८मध्ये श्रीराम पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेच्या आठ शाखा कार्यरत आहेत.’’ अध्यक्ष डेरे म्हणाले, ‘‘माजी आमदार बेनके यांच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून पतसंस्थेचा कारभार पारदर्शक करत असून, सभासदांना उत्तम दर्जाची डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पतसंस्थेत १८६ कोटी रुपयांच्या ठेवी असून, १४६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पतसंस्थेला ३ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाला आहे. आर्थिक वर्ष अखेर २०० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण होईल. नवी मुंबई (वाशी), तळेगाव येथे नवीन शाखा येथे सुरु करणार आहोत.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.