हिवरेतर्फे नारायणगाव येथे बिबट्याच्या मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवरेतर्फे नारायणगाव येथे बिबट्याच्या मृत्यू
हिवरेतर्फे नारायणगाव येथे बिबट्याच्या मृत्यू

हिवरेतर्फे नारायणगाव येथे बिबट्याच्या मृत्यू

sakal_logo
By

नारायणगाव, ता. २५ : हिवरेतर्फे नारायणगाव (ता. नारायणगाव) येथील भोर वस्ती शिवारात शनिवारी (ता. २५) सकाळी सुमारे एक ते दीड वर्ष वयाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळला. मृत बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील शेतकरी संतोष दत्तात्रेय भोर यांच्या गव्हाच्या शेतात शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती स्थानिक शेतकरी नितीन भोर, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे यांनी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी वनरक्षक रामेश्वर फुलवाड, वन कर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांनी भेट देऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजेल, अशी माहिती वनक्षेत्रपाल शिंदे यांनी दिली.

पिंजरा लावण्याची मागणी
या भागात बिबट्याची संख्या वाढली असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत. पाळीव कुत्री, शेळ्या-मेंढ्या, वासरे बिबट्यांनी फस्त केली आहेत. बिबट्याचे दर्शन हे नित्याचे झाले आहे. जीव धोक्यात घालून शेती मशागतीची कामे करावी लागतात. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वसंत भोर, संतोष भोर, नितीन भोर, ईश्वर अडसरे, रामदास भोर, ओंकार भोर, प्रसाद भोर, तानाजी भोर, बाळू भोर या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.