वडगावात बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

वडगावात बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

नारायणगाव, ता.११ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे बिबट्याने सुमारे दहा फूट उंचीच्या लोखंडी जाळीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्यांचा मृत्यू झाल्या. यामुळे रामदास बाबूराव गुंजाळ यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (ता.१०) रात्री दहा वाजता झाली.
जुन्नर वनविभागाने बिबट जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. पिंजऱ्यात बिबट अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्याबरोबरच त्यांचे पाळीव जनावरावर हल्ले वाढले आहेत. यामुळे बिबटे पकडले असले तरी पण संख्या अजून नियंत्रणात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, गुंजाळ यांनी घराजवळ पात्र्याचे शेड टाकून शेळ्यांसाठी गोठा तयार केला आहे. बिबट्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी गोठ्याभोवती तार लावून दहा फूट उंचीचे कंपाउंड केले आहे. मात्र बिबट्याने या दहा फूट उंचीच्या कंपाउंडर उडी मारून गुंजाळ गुंजाळ यांच्या गोठ्यातील सात शेळ्यांवर हल्ला केला व त्यानंतर बिबट्या पसार झाला. दरम्यान, शीघ्र कृती दल सदस्य व जुन्नर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.

कांदळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. एकाच वेळी तीन ते चार बिबटे समूहाने फिरताना दिसतात. ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वडगाव कांदळी येथे तातडीने पिंजरा लावावा.
-गणपतराव फुलवडे, माजी उपसभापती जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com