कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला टोमॅटोचा लिलाव: टोमॅटोला मिळाला उच्चांकी भाव.
नारायणगाव, ता. १० : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शनिवारी (ता.९) सकाळी नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजाराला भेट दिली व लिलाव प्रक्रिया समजून घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी ५५ टोमॅटो क्रेटचा लिलाव केला. त्यांनी केलेल्या लिलावात साहू या देशी वाणाच्या टोमॅटो क्रेटला एक हजार ४०० रुपये (७० रुपये किलोग्रॅम) उच्चांकी बाजारभाव मिळाला. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कृषिमंत्री भरणे जुन्नरच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्त संचालक मंडळाच्या वतीने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांच्या हस्ते त्यांचा नारायणगाव उपबाजार आवारात सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, प्रकाश पाटे, गुलाबराव नेहरकर, ज्येष्ठ संचालक प्रकाश ताजणे, माऊली खंडागळे, सारंग घोलप, आरती वारुळे, तुषार थोरात, पांडुरंग गाडगे, नाना घोडे, जितेंद्र कासार, विमल तळपे नबाजी घाडगे, बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे, आघाडीचे टोमॅटो उत्पादक ईश्वर गायकर, व्यापारी योगेश घोलप, डी.बी.नेहरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भरणे म्हणाले, की जुन्नर, इंदापूर तालुक्यातील शेतकरी नावीन्य पूर्ण प्रयोग करण्यात आघाडीवर आहेत. शासनाच्या ठिबक, शेततळे व अन्य योजनांचा या तालुक्यातील शेतकरी जास्त प्रमाणात लाभ घेतात. तरुण शेतकरी योग्य नियोजन करून द्राक्ष, डाळिंब पिकाचे चांगले उत्पादन घेत आहेत. निसर्गाने साथ दिल्यास व योग्य बाजार भाव मिळाल्यास शेती व्यवसाय फायदेशीर आहे.
खताच्या लिंकिंग संदर्भात शेतकरी व दुकानदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
07015
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.