टोमॅटो खरेदी विक्रीतून १४४ कोटींची उलाढाल

टोमॅटो खरेदी विक्रीतून १४४ कोटींची उलाढाल

Published on

नारायणगाव, ता. १४ : उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या टोमॅटोचा तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षी मार्च ते जुलै २०२५ दरम्यानच्या पाच महिन्यात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात १९ लाख ५ हजार २९२ टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार क्रेटला पन्नास रुपये ते एक हजार रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला. या टोमॅटो खरेदी विक्रीतून १४४ कोटी ९० लाख ७१ हजार ५१३ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

मागील वर्षी मार्च २०२४ ते जुलै २०२४ दरम्यानच्या पाच महिन्यात नारायणगाव टोमॅटो उपबाजारात १६ लाख ८८ हजार २४० टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला होता. खरेदी विक्रीतून ५८ कोटी ७९ लाख ४५ हजार ९०१ रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. तुलनात्मक दृष्ट्या गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी दोन लाख १७ हजार ५२ टोमॅटो क्रेटची जास्त आवक झाली असून ८६ कोटी ११ लाख २५ हजार ६१२ रुपयांची जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे. आर्थिक उलाढालीचा फायदा जुन्नर,आंबेगाव, शिरूर, बारामती,पारनेर,कर्जत,बीड,श्रीगोंदा या तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांना झाला आहे.

टोमॅटो उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळावा या उद्देशाने नारायणगाव उपबाजारात २००४ मध्ये बाजार समितीचे संस्थापक, माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे, स्व. वल्लभ बेनके यांच्या पुढाकारातून टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यात आले. बाजार समितीने शेतकऱ्यांकडून कोणतीही अडत न घेता खुल्या पद्धतीने लिलाव पद्धत सुरू केल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत झाली.

टोमॅटो उपबाजारामुळे पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. राज्यभरातील दोनशे व्यापारी खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या राज्यातील इतर बाजाराच्या तुलनेत नारायणगाव उपबाजारात टोमॅटोला वाढीव बाजारभाव मिळतो.
- संजय काळे, सभापती: कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर


मार्च ते जुलै दरम्यान सन २०२४ व २०२५ मधील टोमॅटोची उलाढाल (रुपयांत)
महिना............ टोमॅटो क्रेट............ आर्थिक उलाढाल............ बाजारभाव
मार्च २०२४............१लाख ७५ हजार २७०............३ कोटी २९ लाख ४८ हजार ८१२............५० ते ३५०
मार्च २०२५............१लाख ७७ हजार ८२०............३ कोटी १३ लाख ६९ हजार ४३७ ............५० ते २५०

एप्रिल २०२४............३ लाख ५५ हजार ४१०............७ कोटी ८२ लाख ४१ हजार ६२५............५० ते ३००
एप्रिल २०२५............२ लाख ५७ हजार ९१०............६ कोटी १५ लाख ५२ हजार ९७५............५० ते ३५०

मे २०२४............४ लाख ४८ हजार ४७०............११ कोटी ६५ लाख ७८ हजार ५६२............१०० ते ४००
मे २०२५............५ लाख ८० हजार ४६२............१७ कोटी ४१ लाख ३८ हजार ६००............५० ते ५५०

जून २०२४............३ लाख ८८ हजार ३७५............३ कोटी ३९ लाख ५३ हजार १५२............३०० ते १२००
जून २०२५............४ लाख ९८ हजार ३४२............१४ कोटी ९५ लाख १४ हजार ६००............२०० ते ५००

जुलै २०२४............३ लाख २० हजार ७१५............३२ कोटी ६२ लाख २३ हजार ७५०............२०० ते १५००
जुलै २०२५............८ लाख ८९ हजार १००............४४ कोटी ४५ लाख ५० हजार............४०० ते १०००


07047

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com