नारायणगावातील शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप

नारायणगावातील शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप

Published on

नारायणगाव, ता. २९ : पर्यावरण संरक्षणाबरोबरच भविष्यकाळात फळांचा आस्वाद घेता यावा हा उद्देश ठेवून येथील महिलांनी स्थापन केलेल्या इंद्रधनू ग्रुपच्या वतीने नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांना चारशे कलमी आंबा आणि नारळ रोपे भेट देण्यात आली. भेट दिलेल्या रोपांचे संवर्धन करू. असा विश्‍वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
फळ रोप वाटपाचे हे सलग सहावे वर्ष आहे. सुमारे अडीच हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. पूर्वी वाटप करण्यात आलेल्या आंबा, अंजीर झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका, माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर यांनी दिली.
इंद्रधनू ग्रुपच्या वतीने शासनमान्य नर्सरीतून दोन वर्षे वयाची कलमी आंबा आणि नारळाची चारशे रुपये खरेदी केली. श्रद्धा युरॉलोजी केअरचे डॉ. रोनक अनिल शेवाळे यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या नारायणगाव, गव्हाळी मळा, नारायणवाडी, ठाकरवाडी, मेहेत्रे मळा परिसरातील
शेतकऱ्यांना शेतावर जाऊन रोपांचे वाटप करण्यात आले. ही रोपे शेतकऱ्यांनी बांधावर लावली आहेत.
रोप वाटपाचे नियोजन इंद्रधनू ग्रुपच्या बोरकर, सुरेखा वाजगे, शीतल ठुसे, प्रांजल भुतडा, जुई बनकर, पुष्पा जाधव, निर्मला गायकवाड यांनी केले. या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील महिलांनी एकत्र येऊन पंधरा वर्षांपूर्वी इंद्रधनू ग्रुपची स्थापना केली आहे. ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने ग्रुपच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्यात मीनथडी जत्रेचे आयोजन केले जाते. करमणुकीसाठी नाटक, सौंदर्यवती स्पर्धेचे आणि सहलीचे आयोजन केले जाते. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी प्रवृत्त केले जाते.
राजश्री बोरकर, संस्थापिका, इंद्रधनू ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com