‘कुकडी’मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

‘कुकडी’मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Published on

नारायणगाव, ता. २३: कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पात ८९.७३ टक्के (२६.६३ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वडज, डिंभे, चिल्हेवाडी, येडगाव या धरणात शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पूर व धरणात येणारा पाणीसाठा (येवा) नियंत्रित करण्यासाठी पाच धरणातून मंगळवार (ता. २३) सकाळपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पाऊस वाढल्यास धरणातील पाण्याचा येवा याचा विचार करून विसर्ग वाढवावा लागणार आहे. यामुळे कुकडी, मीना, घोड, पुष्पावती या नदीकाठच्या नागरिकांना कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता डॉ. ए.डी. बर्कले, उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पांतर्गत पाणलोट क्षेत्रात सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. माणिक डोह धरणाचा अपवाद वगळता कुकडी प्रकल्पा अंतर्गत इतर धरणात जवळपास शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या धरणात पाण्याची आवक वाढल्याने सकाळपासून विसर्ग मीना, कुकडी, पुष्पावती, घोड या नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गात वाढ करावी लागणार असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


सुरू असलेला विसर्ग (क्यूसेकमध्ये)
वडज .......३ हजार ५००
येडगाव........९००
पिंपळगाव जोगे.......५००
डिंभे धरण व वीजगृहमार्फत....... ५ हजार ५००
चिल्हेवाडी .......२५०


पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पाऊस
वडज, येडगाव, माणिक डोह, डिंभे, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ६६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक १ हजार ३८ मिलिमीटर पाऊस डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात झाला आहे. कुकडी प्रकल्पात एक जूनपासून ४८.८३९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. पूर नियंत्रणासाठी सुमारे २२ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारअखेर कुकडी प्रकल्पात २५.४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मंगळवारअखेर झालेला उपयुक्त पाणीसाठा टीएमसी (कंसात टक्के):
येडगाव............१.९४३ (१०० ),
माणिकडोह............७.३५५ (७२.२६ )
वडज............१.१७३, (१००),
पिंपळगाव जोगे............३.६५७ (९४.०१),
डिंभे............१२.५० (१००),
चिल्हेवाडी ............०.८०१(९९.८९)

२३ सप्टेंबर अखेर कुकडी प्रकल्पात सन २०१९ ते २०२५ दरम्यान झालेला उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी (टीएमसी) :
२३ सप्टेंबर २०१९.............९२.१२..............२७.३३
२३ सप्टेंबर २०२०.............७३.८८.............२१.९५
२३ सप्टेंबर २०२१.............८०.०२.............२३.७४
२३ सप्टेंबर २०२२.............९४.७५.............२८.११
२३ सप्टेंबर २०२३.............८५.६६.............२५.४२
२३ सप्टेंबर २०२४.............८५.८७.............२५.४८
२३ सप्टेंबर २०२५.............८९.७३.............२६.६३


07212

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com