Police seized three homemade pistols at Narayangaon

Police seized three homemade pistols at Narayangaon

sakal

Pune Crime : नारायणगावमध्ये अवैध शस्त्रसाठा उघडकीस; पोलीस कारवाईत तीन अटक!

Narayangaon Crime : स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने बसस्थानकाजवळ सापळा रचून तीन तरुणांना गावठी पिस्तूल आणि काडतूससह अटक केली; १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Published on

नारायणगाव : स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा पथकाने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बसस्थानकात संयुक्तरित्या कारवाई करून अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगल्याने तीन तरुणांना अटक केली. आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, नऊ काडतुसे व मोटार सायकल, असा १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

याप्रकरणी धनंजय चक्रधर साळुंखे (वय २०), अनमोल दादाभाऊ जाधव (वय २७, दोघेही रा. कारेगाव, ता. शिरूर), सूरज अप्पासाहेब कर्डिले (वय १८, रा. रामलिंग, ता. शिरूर) या आरोपींना नारायणगाव बसस्थानकात सापळा रचून अटक केली.
अवैध गावठी पिस्तूल तस्करी करणारे व खरेदी- विक्री करणाऱ्या व्यक्ती नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून आरोपींना ३० ऑक्टोबर रोजी अटक केली.

Police seized three homemade pistols at Narayangaon
अवैध गावठी बनावटीच्या पिस्तूलासह आरोपीला अटक

आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे, फौजदार जगदीश पाटील, अंमलदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, मोसीन शेख, संदीप वारे, ओंकार शिंदे, गणेश चंदनशीव, हेमंत विरोळे, अक्षय नवले, रवींद्र जाधव, सुनील कोळी, संकेत जाधव, चेतन पाटील यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com