लघु वितरिकेतील झाडाझुडपांत बिबट्यांचे वास्तव्य
नारायणगाव, ता. ११: कुकडी प्रकल्पाअंतर्गत मीना शाखा कालव्याच्या दक्षिण बाजूकडे जाणाऱ्या मायनॉर नंबर एकमधील लघु वितरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. पर्यायी रस्ता नसल्याने नारायणवाडी परिसरातील स्थानिक शेतकरी, शालेय विद्यार्थी लघु वितरिके लगतच्या रस्त्याचा वापर ये-जा करण्यासाठी करतात. चारीतील झाडाझुडपांमध्ये रात्रीच्या वेळी तरस व बिबट्यांचे वास्तव्य आढळून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून या रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
कुकडी पाटबंधारे विभागाने लघु वितरिकेत वाढलेली झाडे काढून टाकावीत, अशी मागणी माजी सरपंच अशोक पाटे यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नारायणवाडी व हिवरेतर्फे नारायणगाव हद्दीतून जाणाऱ्या मीना शाखा कालव्याला जोडलेल्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या व तीन मीटर रुंदीच्या लघु वितरिकेत बाभळीची झाडे व इतर झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.या लघु वितरिकेच्या दोन्ही बाजूला उसासह इतर बागायती पिके आहेत.
लघु वितरिकेच्या लगत पूर्व बाजूस असलेल्या अरुंद रस्त्याचा वापर नारायणवाडी व हिवरे तर्फे नारायणगाव भागातील शेतकरी, विद्यार्थी ये जा करण्यासाठी करतात. बिबट्याच्या हल्ल्याची भीती असल्याने रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोटारीचा वापर करावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांकडे चार चाकी वाहने नसल्यामुळे व रस्ता अरुंद असल्याने मोटर सायकल व सायकलचा वापर शेतकरी, विद्यार्थी करत असतात. बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची शक्यता असल्याने कुकडी प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या वतीने तीन किलोमीटर लांबीच्या लघुवीतरीकेमधील वाढलेली झाडे झुडपे काढून टाकावीत लघुवीतरीकेची स्वच्छता करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
झाडेझुडपे काढण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागाकडे आर्थिक तरतूद नाही. लघुवीतरीकेचे सिंचन नियोजनासाठी मुक्ताई पाणी वापर संस्था स्थापन केली आहे या संस्थेने झाडेझुडपे काढावीत व स्वच्छता करावी.
- गणेश सिनलकर, शाखा अभियंता: मीना शाखा कालवा
लघुवीतरिका सुमारे तीन किलोमीटर लांबीचे आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने लक्ष न दिल्यामुळे मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढले आहेत. तीन किलोमीटर लांबीच्या लघुवीतरिकेमधील झाडे झुडपे काढण्यासाठी पाणी वापर संस्थेकडे निधी उपलब्ध नाही. बिबट्याचे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागाने झाडेझुडपे काढावीत.
- अशोक पाटे, माजी सरपंच: ग्रामपंचायत नारायणगाव
07456
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

