जुन्नरमध्ये रब्बीची २५ हजार हेक्टर पेरणी
नारायणगाव, ता. २ : जुन्नर तालुक्यात रब्बी हंगामात यावर्षी कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, भाजीपाला, ऊस आदी पिकाखाली एकूण ३५ हजार २७. ५८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, मंगळवारपर्यंत (ता. २) २४ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रात (७१.१४ टक्के) पेरणी व लागवड करण्यात आली आहे.
यावर्षी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता समाधानकारक असल्याने रब्बी भाजीपाला पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली. तालुक्यात यावर्षी सरासरी ७०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात ९३ टक्के (२७.५९९ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कल गहू, कांदा, ऊस व इतर भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे पहिल्या टप्प्यातील कांदा लागवड कमी झाली आहे. सद्यःस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील कांदा लागवड वेगात सुरू आहे. कांदा लागवडीसाठी मजूर टंचाई त्याबरोबरच रोपांची टंचाई याचा सामना कांदा उत्पादकांना करावा लागत आहे. आडसाली, पूर्व हंगामी उसाची लागवड सुरू आहे.
मागील वर्षी लागवड केलेल्या कांद्याला भाव मिळाला नाही. अतिवृष्टीमुळे भाजीपाला, टोमॅटो, सोयाबीन या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात टोमॅटोला भाव मिळाला नाही. द्राक्ष पिकाला घड निर्मिती झाली नाही. खरीप हंगाम तोट्यात गेल्याने रब्बी पिकाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. मजुरी, खते, ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाणारी मशागत आदींचे भाव वाढल्याने अडचणीत भर पडली आहे.
- राजेंद्र वाजगे, राजेश गावडे पाटील, द्राक्ष व भाजीपाला उत्पादक
रब्बी पिके.... एकूण क्षेत्र हे.... लागवड झालेले क्षेत्र हे.... टक्केवारी
तृणधान्य...... १० हजार ५२१.७४ ....... ८ हजार ७०८.९० ......... ८२.७७
कडधान्य....... ४ हजार २२४. ८४ ....... २८३९.९० ............ ६७.२२
भाजीपाला व चारा पिके ....... ११ हजार ३२५ ........ ९६५५.१४....... ८५.२६ .
ऊस....... ८ हजार ९२६ ...... ३ हजार ७१३.११ ........ ४१.६० टक्के.
07546
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

