ग्लोबल कृषी महोत्सवात अडीच कोटींची उलाढाल

ग्लोबल कृषी महोत्सवात अडीच कोटींची उलाढाल

Published on

नारायणगाव, ता. १२: ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ कृषी महोत्सवाला राज्यासह देशाच्या विविध भागांतून शेतकरी, कृषी उद्योजक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी भेट दिली. या वर्षी कृषी प्रदर्शनाला सुमारे एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली.
खरेदी-विक्रीतून सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे आणि डॉ. राहुल घाडगे यांनी दिली.
चार दिवशीय पीक प्रात्यक्षिके, पीक परिसंवाद, कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवाचा समारोप रविवारी (ता. ११) राज्याचे माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे, डॉ. सुयोग खोसे व भरत टेमकर लिखित कृषी घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. कृषी उद्योजक विजय गारगोटे (खेड), पशुसंवर्धन शेतकरी मयूर डुंबरे (ओतूर), नैसर्गिक शेती शेतकरी सीमा जाधव (चिंबळी), मिलिंद भोर (खामुंडी), पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन रहाणे, रामराव दिवटे यांना ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, माजी संचालक (फलोत्पादन) डॉ. सुदाम अडसूळ, संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी. के. ससाणे, संचालिका पूजा बुट्टे-पाटील, अनंतराव चौगुले, तुषार थोरात आदि मान्यवर व ग्रामोन्नत्ती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महोत्सवात यांना मोठी मागणी
इंद्रायणी तांदूळ, गहू, बाजरी, कडधान्ये
विविध रानभाज्या, फळझाडांची कलमे
बचत गटांनी तयार केलेले मसाले
लोणची, पापड, मिलेट पदार्थ
लाडू, चकल्या, हळद पावडर, फुलझाडांची रोपे

प्रदर्शनात २४६ स्टॉल्स
प्रदर्शनात २४६ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये ट्रॅक्टर कंपन्या, शेती अवजारे, अन्न प्रक्रिया मशिनरी, फवारणी यंत्रे, ठिबक सिंचन प्रणाली, द्रवरूप खते आदींचा समावेश होता. पीक प्रात्यक्षिकांतर्गत पन्नास एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने गहू, हरभरा, मका, कांदा, मिरची, केळी, ऊस, तसेच विविध फळबागा,भाजीपाला आणि फुलपिकांची लागवड करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती डॉ. शेटे, डॉ. घाडगे यांनी दिली.

हवामान बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केव्हीके करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, माती व पानदेठ परीक्षणावर आधारित कृषिसल्ला, तसेच महिला व ग्रामीण युवकांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. ग्लोबल कृषी महोत्सवा मुळे आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व बाजाराभिमुख शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्यास चालना मिळाली आहे.
- अनिल मेहेर, अध्यक्ष: केव्हीके, नारायणगाव
07741

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com