नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन
नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन
नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन

नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन नसरापुरात भारती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन

sakal_logo
By

नसरापूर, ता.१८ : येथे (ता. भोर) समाजप्रबोधन सप्ताहात प्रभातफेरी व मेळाव्याव्दारे महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. भारती विद्यापीठ कॉलेज आँफ नर्सिंग प्रसुती व स्त्रीरोग शास्त्र विभागातील विद्यार्थिनींच्या वतीने डॉ. पतंगराव कदम जयंती व डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
नसरापूर येथे गावात नसरापूर येथे ग्रामपंचायत नसरापूर व तनिष्का महिला व्यासपीठाच्या सहकार्याने भारती नर्सिंग काँलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हातात आरोग्य विषयक घोषणाचे फलक घेऊन प्रभात फेरी काढली. या नंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास नसरापूरच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच संदीप कदम, तनिष्का प्रतिनिधी वैशाली झोरे, आशा वर्कर शीला चाळेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अनिल नाईक, नर्सिंग काँलेजच्या प्राचार्या डॉ. भाग्यश्री जोगदेव, स्त्री रोग विभाग प्रमुख मनिषा गदादे, डॉ सुप्रिया पट्टोल रे, डॉ मेमचुबी, सुजीता देवी, सोनाली अत्रे आदी उपस्थित होते.
मेळाव्यात स्त्री सक्षमीकरण व स्त्री आरोग्य जनन संस्थेची काळजी कशी घ्यावी या बाबत जागृती करण्यात आली गर्भाशयाचा कर्करोग,स्तनांचा कर्करोग,लैगिंक संक्रमीत रोग,एच आय व्ही,रजोनिवृत्ती या बरोबरच महिलांसाठी पोषक आहार या विषयावर माहिती देण्यात आली.
03050