साळवडे येथे ग्रामीण कृषी जागृकता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळवडे येथे ग्रामीण कृषी जागृकता अभियान
साळवडे येथे ग्रामीण कृषी जागृकता अभियान

साळवडे येथे ग्रामीण कृषी जागृकता अभियान

sakal_logo
By

नसरापूर, ता.१७. साळवडे (ता.भोर) येथे कृषी प्रात्यक्षिक अनुभवासाठी आलेल्या कृषिकन्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यां समवेत युवादिन साजरा करत विद्यार्थ्यांना युवादिनाचे महत्त्व सांगितले.
पुणे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषिकन्याही ग्रामीण कृषी जागृकता अभियान व औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात वास्तव्य होते.
दरम्यान, गावामधील शेतकऱ्यांना विविध शेती प्रयोगाची माहिती देऊन आधुनिक शेती तंत्राची माहिती देण्यात येत आहे. या बरोबरच या कृषीकन्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यां समवेत जागतिक युवादिन साजरा केला यावेळी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना युवादिनाचे महत्त्व स्पष्ट करून देत स्वामी विवेकानंद यांचे विचार व राष्ट्रभक्ती ची माहिती दिली व विद्यार्थ्यांना विवेकानंदाच्या विचाराचे अनुकरण करण्याचे आवाहन केले
यावेळी कृषिकन्या प्रतिक्षा पाटील,प्रांजली महाले, शौर्या परिहार, ममता भुकया,भुवनेश्वरी मोरे,सोनम कुमारी, अकांक्षा मावची,प्राजक्ता पर्बत,स्नेहल पवार,या उपस्थित होत्या.
या कार्यानुभव कार्यक्रमात कृषिकन्यांना डॉ. एस. डी. मसकर, व्ही. डी. जगदाळे,कार्यक्रम अधिकारी पी. डी. सूर्यवंशी हे मार्गदर्शन करत आहेत.

03052