दिवळे येथील पांगारे यांच्याशी कृषिकन्यांनी साधला संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवळे येथील पांगारे यांच्याशी कृषिकन्यांनी साधला संवाद
दिवळे येथील पांगारे यांच्याशी कृषिकन्यांनी साधला संवाद

दिवळे येथील पांगारे यांच्याशी कृषिकन्यांनी साधला संवाद

sakal_logo
By

नसरापूर, ता.३० : दिवळे ( ता.भोर) येथील आदर्श शेतकरी रमेश कृष्णा पांगारे यांची कृषिकन्यांनी मुलाखत घेतली. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषी महाविद्यालय पुणे या उपक्रमाचे आयोजन केले होते. पॉलिहाऊसमधील शेतीचे भरघोस उत्पादन, किडींचे नियंत्रण, खतांचा वापर, पाणी पद्धती आदी विविध घटनांबाबत त्यांनी कृषिकन्यांशी संवाद साधला.

कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त रमेश कृष्णा पांगारे यांनी गेल्या १४ वर्षांपासून शेतीच्या आधुनिक पद्धतींचा वापर करून उभारलेल्या पॉलिहाऊस मध्ये जरबेरा, जिप्सो व शिमला मिरची चे भरघोस उत्पादन घेत आहेत. पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळताना पांगारे यांनी सुरुवातीला केवळ १० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊसची उभारणी केली होती. त्यांना या प्रवासात त्यांच्या पत्नीची देखील मोलाची साथ मिळाली आहे. या वेळी कृषिकन्या पूजा शेंडगे, श्रावणी पालघट, सोनम रघुवंशी, तेजस्विनी सेंदाणे, सायली देशमुख, चैतन्या औटे, निकिता नरसाळे, ऋतुजा धुमाळ, शिल्पा गायकवाड उपस्थित होत्या. यासाठी कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाच्या केंद्र प्रमुख डॉ. एस.एस.खांडवे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एस.शिंदे यांचे मार्गदर्शन घेतले.

03078