Mon, March 20, 2023

हातवे येथील विवाहितेचा छळ
हातवे येथील विवाहितेचा छळ
Published on : 13 February 2023, 4:03 am
नसरापूर, ता. १३ : शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी हातवे बुद्रुक (ता. भोर) येथील विवाहितेने पुणे येथील स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी विवाहिता उत्कर्षा विजय सणस (रा. हातवे बुद्रुक, ता. भोर; सध्या रा. महर्षीनगर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार त्यांचे पती विजय मारुती सणस, सासरे मारुती महादेव सणस, दोन सासू वैजयंती व माधुरी मारुती सणस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्वारगेट पोलिसांनी तपास चालु केला असून, उत्कर्षा यांचा पती विजय यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली; तर सासरे व दोन सासू यांची चौकशी चालु आहे.