Tue, March 28, 2023

रसवंतीगृह मशिनची
धांगवडी येथून चोरी
रसवंतीगृह मशिनची धांगवडी येथून चोरी
Published on : 25 February 2023, 2:59 am
नसरापूर, ता. २५ : धांगवडी (ता. भोर) येथे पुणे-सातारा महामार्गालगतच्या शेतात चालू केलेल्या रसवंतीगृहातील रस गाळण्याचे मशिन चोरीस गेले. याप्रकरणी रसवंतीगृह मालकाने तीन जणांवर आरोप करत त्यांच्या नावे राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत भूषण पाडुरंग तनपुरे (वय २१, रा. धांगवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांच्या शेताच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गालगत कृष्णाई रसवंतीगृह चालु केले असून, या रसवंतीगृहातील रस गाळण्याचे अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे मशिन शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री साडेबारा ते सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान चोरीला गेले असून, हे मशिन तिघांनी मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरल्याचा आरोप फिर्यादी भूषण तनपुरे यांनी केला आहे.