नवीन संकल्पना आत्मसात करून व्यापार वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन संकल्पना आत्मसात करून व्यापार वाढवा
नवीन संकल्पना आत्मसात करून व्यापार वाढवा

नवीन संकल्पना आत्मसात करून व्यापार वाढवा

sakal_logo
By

नसरापूर, ता.१३ : ''''संघटित झाल्याशिवाय प्रगती होत नाही. हे ओळखून रिटेल व्यापाऱ्यांनी नवीन संकल्पना आत्मसात करत काळानुरुप बदलून व्यापार वाढवला पाहिजे,'''' असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी व्यापाऱ्यांना केले.

नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वरमधील सांस्कृतिक भवनात नसरापूर व्यापारी असोसिएशनने भोर व वेल्हे तालुक्यातील व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी निवंगुणे पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी पुणे सिंहगडरोड व्यापारी संघटनेचे भूषण बोरा उपस्थित होते.

कोरोनानंतरच्या कालावधीत व्यापारात फार मोठे बदल झाले आहेत. अनेक व्यवसाय नव्याने सुरू झाले तर अनेक बंद पडले. गावोगावी दुकाने सुरु झाली, ग्राहकवर्ग पांगला व ऑनलाइन व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. या सर्व घडामोडींना तोंड देताना गावोगावचे व्यापारी हताश झाले असून, यावर मार्ग काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांच्यामधील एकी वाढवली पाहिजे, नव्या संधी शोधल्या पाहिजेत. ग्राहकाला आपल्या दुकानात परत येण्यासाठी विनम्र व तत्पर सेवा दिली पाहिजे, असे आवाहन निवंगुणे यांनी केले.

मेळाव्यात उद्योजक अनिल गयावळ यांनी व्यापारी एकता फक्त बंद करणे किंवा तक्रारीसाठी न होता प्रगतीसाठी देखिल झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रकाश चाळेकर यांनी व्यापाऱ्यांनी एकमेकांना स्वतःहाचे शत्रू न मानता मित्र मानले तरच सर्वांच प्रगती होईल असे सांगितले. राजेंद्र कदम तसेच अजिंक्य हाडके यांनी दुकानदारांनी एकावेळेस प्लास्टिक बंद करून कागदी किंवा कापडी पिशवी वापरण्याचा सल्ला दिला.

मेळाव्यास नसरापूरचे उपसरपंच संदीप कदम, सदस्य सुधीर वाल्हेकर, नसरापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गयावळ, कार्याध्यक्ष प्रदीप राशिनकर, प्रकाश चाळेकर, उपाध्यक्ष महेश वनारसे, रमेश कदम, खजिनदार विजय गयावळ, सचिव वैभव भुतकर, जागृत ग्राहकराजा संघटनेचे राज्यअध्यक्ष दिलीप फडके, नसरापूर येथील व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.
गणेश पालकर यांनी प्रास्ताविक केले. किरण भदे यांनी सूत्रसंचालन तर विजय जंगम यांनी आभार मानले.

03193