नसरापूरला आज
महायुतीची सभा

नसरापूरला आज महायुतीची सभा

नसरापूर, ता. ३० : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार व जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नसरापूर चेलाडी (ता. भोर) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे.
याबाबत वेळू (ता. भोर) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड, मनसेचे दीपक पांगारे, शिवसेनेचे भोर विधानसभा अध्यक्ष गणेश मसुरकर, तालुकाप्रमुख दशरथ जाधव, अमोल पांगारे, शिवाजी अवचरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com