शिरवळ अपघातातील जखमी 
नसरापूरच्या तरुणाचा मृत्यू

शिरवळ अपघातातील जखमी नसरापूरच्या तरुणाचा मृत्यू

नसरापूर, ता. १५ : शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातार) येथे पुणे- सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नसरापूर (ता. भोर) येथील सागर बनेश्वर जंगम (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान नसरापूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
शिरवळ येथे पुणे- सातारा महामार्गावर ‘हॉटेल विसावा’समोर ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नादुरुस्त ट्रकची दुरुस्ती चालु असताना सुरक्षेसाठी रस्त्यावर मांडलेल्या लाकडी फळीला सातारा बाजूकडे जाणाऱ्या सागर याच्या दुचाकीची धडक बसून अपघात झाला. त्यामध्ये सागर याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी त्यास शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सोमवारी (ता. १३) रात्री उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई, वडील, विवाहीत भाऊ- बहीण, असा परिवार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com